Advertisement

वरळी: इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून दगड पडून अपघात, दोघांचा मृत्यू

वरळी पोलिसांनी पुष्टी केली की निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल कंत्राटदार आणि उपकंत्राटदारांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदविला जाईल.

वरळी: इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून दगड पडून अपघात, दोघांचा मृत्यू
Picture Courtesy: ANI
SHARES

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या (Building) 42 व्या मजल्यावरून बांधकामासाठी वापरला जाणारा मोठा दगड खाली पडून अपघात घडला आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) वतीनं देण्यात आली आहे.

मुंबईतील वरळी (Worli News) परिसरातील ही घटना आहे. तसेच या परिसरातील अनेक वाहनांवर देखील दगड पडल्याची घटना देखील घडली आहे. साबीर अली (वय 36) आणि इम्रान अली खान (वय 30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

अपघातत मृत्यू झालेले दोघेही रस्त्यावर चहा पीत होते. त्यावेळी अचानक इमारतीच्या 42 व्या मजल्यावरुन दगड खाली कोसळला. यात ते दोघेही जखमी झाले. दुर्घटनेनंतर बसाच वेळ हे दोघेही गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

तेथून जात असलेले वकील शरद कोळी यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, त्यांना मोठा आवाज आणि लोकांच्या किंचाळण्याचा आवाज आला. “मला वाटले की भांडण झाले पण काँक्रीटच्या स्लॅबचे ढिगारे विखुरलेले पाहिले आणि दोन बळी जागीच मरण पावले. ते एक भयानक दृश्य होते. काही मिनिटांपुर्वी मी हीच जागा पार केली होती.”

कंत्राटदार व उपकंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा

कोळी म्हणाले की, उंच इमारतीवर बांधकामाची क्रेन होती आणि क्रेनचे वजन संतुलित करण्यासाठी वापरलेले सिमेंटचे ब्लॉक दोन जणांवर पडले. “सुरक्षा जाळ्या नव्हत्या. कंत्राटदाराने घटनास्थळी आसपासच्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करायला हवी होती. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कोळी यांनी सांगितले की, क्रेनचा वापर सुरू असलेल्या बांधकामातील वस्तू हलवण्यासाठी केला जात होता. काही तांत्रिक बिघाडामुळे क्रेनवरील स्लॅब जमिनीवर पडला.

ते म्हणाले की, खाली फूटपाथवर अनेक लोक राहतात आणि स्लॅब पडलेल्या ठिकाणी बसले होते. त्यातील दोघे (मृत) चहा पीत होते.

वरळी पोलिसांनी पुष्टी केली की निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याबद्दल कंत्राटदार आणि उपकंत्राटदारांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदविला जाईल.



हेही वाचा

मरीन लाइन्स स्थानकावरील दक्षिण बाजूचा फूट ओव्हर ब्रिज १५ फेब्रुवारीपासून बंद

राज्यातील तापमानात 15 फेब्रुवारीनंतर वाढ होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा