Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

२६/११ च्या हल्ल्यात शस्त्र शोधून देणारा कॅनिंग सैनिक ‘नॉटी श्वाना’चा मृत्यू

लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब यानं लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानानं शोधून काढला होता.

२६/११ च्या हल्ल्यात शस्त्र शोधून देणारा कॅनिंग सैनिक ‘नॉटी श्वाना’चा मृत्यू
SHARES

मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ला झालेल्या २६/११च्या हल्ल्यावेळी शस्त्र आणि दारूगोळा शोधण्यात कॅनिंग सैनिक असलेल्या श्वानांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या हल्ल्यावेळी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या निवृत्त कॅनिंग सैनिक असलेल्या एका श्वानाचं निधन झालं आहे. या श्वानाचं नाव नॉटी असं आहे.

पालघरमधील सफाळे इथल्या माजी रणजीपटू राजेश सुतार यांनी त्याला दत्तक घेतलं होतं. ब्लॅक लॅबरेडॉर जातीचा असलेला नॉटी हा २०१४ मध्ये सेवा निवृत्त झाला होता. लष्कर ए तोयबाचा दहशदवादी अजमल कसाब यानं लपवलेला शस्त्रसाठा आणि दारुगोळा याच श्वानानं शोधून काढला होता.

नॉटी अचानक आजारी पडला. त्याचं वय १४ वर्ष पूर्ण झालं होतं. बॉम्बे वेटरनरी कॉलेज, लोअर परेल स्पंदन या स्वयंसेवी संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात नॉटीने शौर्य पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होत

२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबईत एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले झाले होते. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या परिसरात झाले होते.

भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करण्यासाठी आधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. मुंबई पोलीस आणि भारतीय सैन्यदलाला तीन दिवसानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा