Advertisement

एसटीच्या ताफ्यात 3 हजार नव्या बस

या बसेस आधीपेक्षा आधुनिक असल्यामुळे प्रवासही वेगवान आणि अधिक सुरक्षित होणार आहे.

एसटीच्या ताफ्यात 3 हजार नव्या बस
SHARES

शिवशाही आणि शिवनेरी बससेवेनंतर महाराष्ट्र (maharashtra) राज्य रस्ते वाहतूक महामंडळाकडून राज्यभरात नवी बससेवा सुरू होणार आहे.

या नव्या एसटी बसला राजमाता जिजाऊ (jijau buses) असे नाव दिले असून यापूर्वीच्या एसटी बसपेक्षा अत्याधुनिक बस असणार आहे.

या सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (devendra fadnavis) हस्ते 24 मार्च रोजी होणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा सध्या शेवटचा आठवडा सुरू आहे.

मंगळवारी विधीमंडळाच्या प्रांगणात हे लोकार्पण होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि सुनेत्रा पावर देखील उपस्थित असतील.

सध्या मुंबई (mumbai)-पुणे (pune) आणि इतर मोठ्या शहरांदरम्यान शिवनेरी, शिवशाही, शिवाई सारख्या बस एसटी महामंडळाकडून चालवल्या जातात.

या बसला नेहमी गर्दी असून तिकीटांच्या परवडणाऱ्या दरामुळे मोठी मागणी असते. अनेकदा प्रवाशांना उभं राहून संपूर्ण प्रवास करावा लागतो. पण आता राजमाता जिजाऊ बस सेवेमुळे बसच्या संख्येत वाढ होणार आहे.

या बसेस आधीपेक्षा आधुनिक असल्यामुळे प्रवासही वेगवान आणि अधिक सुरक्षित होणार आहे.

आता सुरू असलेल्या बसची आसन क्षमता 40 आहे. पण या नव्या बसमध्ये 3 बाय 2ची आसन रचना असून 56 आसन क्षमता असणार आहे.

यामुळे साधारण बसेसपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकतात. शिवाय या नव्या बसेस स्मार्ट बसेस असतील. यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

दोन प्रमुख शहरांदरम्यान शटल सेवेसारख्या या बसेस चालवल्या जातील. प्रवास अधिक सुखकर करण्याच्या हेतूने ही सेवा सुरू होणार आहे. लवकरच या बसेसेवाचा विस्तार नागपूरहून इतर शहरांतही करण्यात येणार आहे.

मंगळवारी होणााऱ्या या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित असतील.

यामध्ये विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

दरम्यान, या बसमध्ये 4 CCTV कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, सुरक्षेसाठी पॅनिक बटन, महत्त्वाची माहिती देण्यासाठी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम आणि प्रवासाचा मार्ग दर्शवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मार्ग फलकसुद्धा असतील.



हेही वाचा

कुत्र्यांचे निर्बीजीकरण करूनही कुत्र्यांचा उपद्रव कायम

1 एप्रिलपासून एटीएमच्या नियमात बदल



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा