Advertisement

राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण; एकूण ८५९० ग्रस्त

राज्यभरात नव्या ५२२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण; एकूण ८५९० ग्रस्त
SHARES

राज्यभरात नव्या ५२२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं एकूण रुग्णसंख्या ८५९० झाली आहे. सोमवारी ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख २ हजार ५२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ८५९० जण पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ९,३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३६९ झाली आहे. सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे १५, अमरावती शहरातील ६, पुणे शहरातील ४ तर जळगाव येथील १ आणि औरंगाबाद शहरातील १ रुग्ण आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू हे दिनांक २० ते २५ एप्रिल २०२० या कालावधीतील आहेत.

सोमवारी झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १२ महिला आहेत. २७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ६ रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. या २७ रुग्णांपैकी २२ जणांमध्ये (८१ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. 

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील

  • मुंबई महानगरपालिका: ५७७६ (२१९)
  • ठाणे: ४० (२)
  • ठाणे मनपा: २९५ (४)
  • नवी मुंबई मनपा: १३५ (३)
  • कल्याण डोंबिवली मनपा: १४५ (३)
  • उल्हासनगर मनपा: २
  • भिवंडी निजामपूर मनपा: १४
  • मीरा भाईंदर मनपा: १२१ (२)
  • पालघर: २५ (१)
  • वसई विरार मनपा: १२१ (३)
  • रायगड: १८
  • पनवेल मनपा: ४३ (१)
  • ठाणे मंडळ एकूण: ६७३५ (२३८)
  • नाशिक: ४
  • नाशिक मनपा: १९
  • मालेगाव मनपा: १२३ (१२)
  • अहमदनगर: २६ (२)
  • अहमदनगर मनपा: १६
  • धुळे: ४८(२)
  • धुळे मनपा: १७ (१)
  • जळगाव: १८ (४)
  • जळगाव मनपा: २ (१)
  • नंदूरबार: ११ (१)
  • नाशिक मंडळ एकूण: २४४ (२३)
  • पुणे:५८ (३)
  • पुणे मनपा: ९६९ (७४)
  • पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)
  • सोलापूर: ६
  • सोलापूर मनपा: ५९ (५)
  • सातारा: २९ (२)
  • पुणे मंडळ एकूण: ११९३ (८७)
  • कोल्हापूर: ७
  • कोल्हापूर मनपा: ४
  • सांगली: २६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
  • सिंधुदुर्ग: १
  • रत्नागिरी: ८ (१)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ४७ (२)
  • औरंगाबाद:१
  • औरंगाबाद मनपा: ५१ (६)
  • जालना: २
  • हिंगोली: ८
  • परभणी: ०
  • परभणी मनपा: १
  • औरंगाबाद मंडळ एकूण: ६३ (६)
  • लातूर: १० (१)
  • लातूर मनपा: ०
  • उस्मानाबाद: ३
  • बीड: १
  • नांदेड: ०
  • नांदेड मनपा: ३
  • लातूर मंडळ एकूण: १७ (१)
  • अकोला: ११ (१)
  • अकोला मनपा: १८
  • अमरावती: १
  • अमरावती मनपा: २१ (७)
  • यवतमाळ: ६२
  • बुलढाणा: २१ (१)
  • वाशिम: १
  • अकोला मंडळ एकूण: १३५ (९)
  • नागपूर: ४
  • नागपूर मनपा: १२३ (१)
  • वर्धा: ०
  • भंडारा: १
  • गोंदिया: १
  • चंद्रपूर: ०
  • चंद्रपूर मनपा: २
  • गडचिरोली: ०
  • नागपूर मंडळ एकूण: १३१ (१)
  • इतर राज्ये: २५ (२)
  • एकूण: ८५९० (३६९)
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा