Advertisement

बोईसर येथील औद्योगिक क्षेत्रात स्फोट, ८ जण ठार

बोईसर येथील औद्योगिक क्षेत्रात झालेल्या स्पोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

बोईसर येथील औद्योगिक क्षेत्रात स्फोट, ८ जण ठार
SHARES

बोईसर येथील औद्योगिक क्षेत्रात झालेल्या स्पोटात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून, 'नायट्रेट' मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्पोटात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसंच, पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासाला सुरूवात केली.

स्पोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास 'तारा नायट्रेट' इथं स्फोट झाला.

नुकतीच ही कंपनी तयार केली गेली होती आणि नायट्रेट (खते आणि स्फोटकांमध्ये वापरल्या जाणारा सामान्य कंपाऊंड) प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी अणुभट्टी चाचणीसाठी चालू केली जात असताना स्फोट झाल्याचं समजतं. या स्पोटांमुळं आसपासचा परिसराला हादरा बसला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा