Advertisement

विलेपार्लेत 8 ते 10 घरे कोसळली, रहिवाशांचा मेट्रोच्या कामावर आरोप

तर 40 पेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत.

विलेपार्लेत 8 ते 10 घरे कोसळली, रहिवाशांचा मेट्रोच्या कामावर आरोप
SHARES

मुंबईत विलेपार्ले येथे आठ ते दहा घरे कोसळली आहेत. तर 40 पेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत. मेट्रोच्या कामांमुळे घरांना हादरे बसत असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय.

विलेपार्ले पश्चिमेकडील इंदिरा नगर परिसरात रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

सुदैवाने घरं कोसळण्यापूर्वी सर्व घरे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.  

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा