Advertisement

नाशिक : बसला आग लागून 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू

धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

नाशिक : बसला आग लागून 9 प्रवाशांचा जागीच मृत्यू
SHARES

नाशिक येथे मोठी दुर्घटना घडली आहे. खाजगी बसला (Bus Fire) भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात आठ ते दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

ही बस स्लीपर कोच होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला आग लागून हा भीषण अपघात झाला आहे. धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या ट्रेलरची बसला धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. ट्रेलरची बसला धडक बसली, यामुळे बसने पेट घेतला. यामध्ये आठ ते दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दलाकडून अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. स्लीपर बसमध्ये सुमारे 30 प्रवाशी होते. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा