Advertisement

कोरोनामुळं ४ महिन्यात तब्बल ९५ पोलिसांचा मृत्यू


कोरोनामुळं ४ महिन्यात तब्बल ९५ पोलिसांचा मृत्यू
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी होताना पाहायला मिळत नाही. अशावेळी कोरोना रुग्णांचं मृत्यूचं प्रमाणही चिंता वाढवणारं आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत राज्यातील पोलीस दलाचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ४ महिन्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी जिवाची बाजी लावून अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कर्तव्य पार पाडत असताना कोरोनामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू होत आहे.

२०२१च्या सुरुवातीला कोरोनामुळं मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं प्रमाण कमी होतं. पण एप्रिल महिन्यात तब्बल ६४ पोलिसांचा कोरोनामुळे जीव गेलाय. तर मे महिन्याच्या सुरुवातीच्या २ दिवसांत ५ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुण पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोलीस दलासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६४ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर मे महिना आता सुरू झाला आहे. मे महिन्याच्या २ दिवसात ५ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

२०२१ मध्ये पोलिसांच्या मृत्यूचं प्रमाण

  • जानेवारी – १२ पोलिसांचा मृत्यू
  • फेब्रुवारी – २ पोलिसांचा मृत्यू
  • मार्च – १२ पोलिसांचा मृत्यू
  • एप्रिल – ६४ पोलिसांचा मृत्यू
  • मे – ५ पोलिसांचा मृत्य
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा