Advertisement

दादर ते सिद्धीविनायक एसी बससेवा सुरू होणार

या बससेवेमुळे सिद्धीविनायकला जाणाऱ्या भाविकांना आता गारेगार प्रवास करता येणार आहे.

दादर ते सिद्धीविनायक एसी बससेवा सुरू होणार
SHARES

सिद्धिविनायक मंदिरात ये-जा करणाऱ्या भक्तांची व प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता नवीन वातानुकूलित बससेवा शनिवारपासून 20 ते 22 मिनिटांच्या अंतराने सोडण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या निर्देशानुसार सिद्धिविनायक मंदिर येथील भाविकांच्या व प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे त्यांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातर्फे दादर स्थानक (प.) (dadar) आणि सिद्धिविनायक मंदिर (prabhadevi) दरम्यान नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बसमार्ग 'श्री सिद्धिविनायक फेरी' (ए-814) शनिवार 23 मेपासून वर्तुळाकार सेवेत कार्यान्वित करण्यात येत आहे.

दादर स्थानक (प.), डॉ. ॲन्टोनी डिसिल्वा हायस्कूल, प्रबोधनकार ठाकरे चौक, श्री सिद्धिविनायक मंदिर, रवींद्र नाट्यमंदिर (पोर्तुगीज चर्च), आगरबाजार, दादरस्थानक (प.), (प्रभादेवी) दादर पोलिस ठाणे, शारदाश्रम, कबुतरखाना.

बसची सुटण्याची वेळ

दादर स्थानक (प.) - पहिली बस सकाळी 7 वाजता

दादर स्थानक (प.) - शेवटची बस रात्री 8.55 वाजता



हेही वाचा

ॲक्वा लाईनमध्ये तांत्रिक बिघाड

मुंबईतील ऐतिहासिक वांद्रे तलावाच्या पुनरुज्जीवन मोहिमेला वेग

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा