Advertisement

बेलापूरमधील अनधिकृत बांधकामांवर नवी मुंबई पालिकेची कारवाई

नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal corporation) अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई तीव्र केली आहे. मागील आठवड्यात ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली होती.

बेलापूरमधील अनधिकृत बांधकामांवर नवी मुंबई पालिकेची कारवाई
SHARES

नवी मुंबई महापालिका (navi mumbai municipal corporation) अतिक्रमण विभागाने अनधिकृत बांधकामांवर कारवाई तीव्र केली आहे. मागील आठवड्यात ऐरोली व घणसोली कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली होती. आता गुरूवारी बेलापूरमधील अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडलं आहे. 

बेलापूर गावातील सेक्टर २० मधील लक्ष्मण तुकाराम भोईर आणि  सत्यवान सावळाराम म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरु केलं होतं. अनाधिकृत बांधकामास बेलापूर विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. संबंधीताने केलेले अनाधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरु ठेवलं होतं. 

हे अनाधिकृत बांधकाम कारवाई करून पालिके तोडलं आहे.  या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी / कर्मचारी, १८ मजूर २ गॅस कटर ,२ इलेक्ट्रीकल हॅमर तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते. या पुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. 

मागील आठवड्यात ऐरोली (Airoli) विभागातील सेक्टर ३ मध्ये भूखंड क्रमांक जे-२६७, जे-२७७, जी-१३१ व डी-४ याठिकाणी तळमजला + २ मजली इमारतीचं बांधकाम पालिकेने तोडलं होतं. तर घणसोली (Ghansoli) विभागातील ‍शिवाजी तलाव परीसर,  घणसोली गाव येथे आरसीसी तळमजला कॉलमचे बांधकाम महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरू  होते. या अनधिकृत बांधकामास घणसोली विभागामार्फत नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र तरीही हे अनधिकृत बांधकाम सुरूच होतं. हे बांधकामही पालिकेने तोडलं आहे. 



हेही वाचा-

जुलै महिन्यात ९६ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज

बापरे! लसीकरण शिबिरांत सलाइन वॉटरचा वापर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा