Advertisement

'ही' कामं अंमलात न आणल्यास कारवाई


'ही' कामं अंमलात न आणल्यास कारवाई
SHARES

मुलुंड जिमखान्याशेजारी भूखंड ताब्यात घेण्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. ताब्यात आलेल्या भूखंडावर संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यानंतरही जिमखान्याच्या मदतीने काही अधिकारी यात बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि बाजार उद्यान विभागाचे अध्यक्षही यामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत भाजपाने सत्ताधारी पक्षाला टार्गेट केलं.

स्थायी समिती अध्यक्षांनी असा प्रकार भविष्यात घडू नये अशी सक्त ताकीद देत जे अधिकारी याप्रकरणात सामील असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.


यावर अंकूश कुणाचा?

एल विभागातील चांदिवली फार्म रोडवरील टीडीआर प्लॉट या भूखंडावर उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं सांगितलं. मंजूर केलेल्या प्रस्तावातील आराखड्यात फेरबदल केला जात असून यासाठी कधी बाजार आणि उद्यान विभागाचे अध्यक्ष तर कधी स्थायी समिती अध्यक्ष पाहणी करून बदल सुचवतात. त्यामुळे स्थायी समितीने एकदा प्रस्ताव मंजूर केला की तो मार्गी लागायला हवा, असं सांगितलं. त्यामुळे जर मंजूर केलेल्या प्रस्तावात फेरबदल होत असेल तर यावर अंकूश कुणाचा? असा सवाल कोटक यांनी केला.


त्यांची चौकशी करा

स्थायी समितीने मंजूर केलेल्या अधिकारात जे अधिकारी ढवळाढवळ करतात, त्यांची चौकशी केली जावी, असं सांगत मुलुंड जिमखान्याशेजारी जो भूखंड ताब्यात घेतला आहे, त्या भूखंड विकासाच्या प्रस्तावात बदल करण्याचा घाट काही अधिकारी करत असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. सपाचे रईस शेख यांनीही याला पाठिंबा देत जर असं एखाद्या खासगी संस्थेकडून होत असेल तर ते दुर्देवी असल्याचं सांगितलं.

यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी निर्देश देत, स्थायी समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावात भविष्यात कुणी बदल करण्याचा प्रयत्न करू नये. जर असा प्रकार पुन्हा घडल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल, असंही निर्देश प्रशासनाला दिला.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा