Advertisement

धोका टाळणारी रिअॅक्टर सुरक्षितता कार्यशाळा!

रिअॅक्टर अपघात टाळण्यासाठी रासायनिक कारखान्यातील सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व उत्पादन व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

धोका टाळणारी रिअॅक्टर सुरक्षितता कार्यशाळा!
SHARES

रासायनिक कारखान्यातील रिअॅक्टरच्या अपघातामध्ये वाढ झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात जीवितहानी तसंच, वितहानी होते. त्यामुळं हे रिअॅक्टर अपघात टाळण्यासाठी रासायनिक कारखान्यातील सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व उत्पादन व्यवस्थापक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबईच्या परळ परिसरात असलेल्या नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था इथं औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार विभागा यांच्यामार्फत या 'अॅक्टसेफ-२०२१' रिअॅक्टर सुरक्षितता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं.

या २ दिवसीय 'अॅक्टसेफ-२०२१' रिअॅक्टर सुरक्षितता कार्यशाळेचं आयोजन डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS) कामगार आयुक्त व संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं. तसंच, या आयोजनावेळी या 'अॅक्टसेफ-२०२१' रिअॅक्टर सुरक्षितता या कार्यशाळेचं उद्धाटन कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. या आयोजनावेळी राज्यमंत्री कामगार ओमप्रकाश बच्चू कडू, विनिता वेद सिंगल (IAS), प्रधान सचिव, डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS) उपस्थित होते.

रिअॅक्टर सुरक्षितता कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या सुरक्षा अधिकारी, पर्यवेक्षक व प्रॉडक्शन मॅनेजर यांनी आपल्या रासायनिक कारखान्यात जाऊन इतर कामगारांना रिअॅक्टर सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण दिल्यास अपघात टाळण्यासाठी मदत होईल. हेच या कार्यशाळेचं उद्दिष्ट आहे. शिवाय, या संचालनालयचं 'शून्य अपघात' हे उद्दिष्ट देखील साध्य होईल. - डॉ. महेंद्र कल्याणकर (IAS), कामगार आयुक्त व संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रासायनिक कारखान्यांमध्ये अपघाताचे तसंच आग, स्फोट इत्यादी घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं हे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्रातील रासायनिक कारखान्यातील ऑपरेटर्स/ सुपरवायझर्स यांच्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय व नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'CHEMSAFETY' या विषयांतर्गत विविध महत्वाच्या विषयांवर ३ दिवसीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी या कार्यशाळेचं आयोजन उप संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, रायगड विक्रम काटमवार यांनी केलं होतं.

महाराष्ट्रातील औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, संचालनालयाच्या विविध विभागामधून रासायनिक कारखान्यातील ऑपरेटर्स/सुपरवायझर्स यांच्यासाठी एकुण १८ विभागीय प्रत्येकी ३ दिवसीय कार्यशाळेते आयोजन परळ येथील नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था इथं करण्यात आलं होतं. तसंच, या १८ कार्यशाळांमध्ये एकुण ९८६ रासायनिक कारखान्यांतील प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या ऑपरेटर्स/सुपरवायझर्स यांना प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात आलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा