आदित्य ठाकरे पालिका आयुक्तांच्या भेटीला


SHARE

सोमवारी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या 'स्टार्टअप हब आणि इनोव्हेशन पॉलिसी' यावर चर्चा केली. याचसोबत यासंदर्भाचा प्रस्ताव लवकरच महापालिकेत सादर केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पालिका यासंदर्भात आयआईटी बॉम्बेसोबत एक करार करणार आहे. यासाठी लागणारी जागा अंधेरीमध्ये अस्तित्वात असून ती समाज कल्याण केंद्रासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटले आहे की, लवकरच सुरू करण्यात येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या 'स्टार्टअप हब आणि इनोव्हेशन पॉलिसी' च्या प्रगती संदर्भात महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. याचसोबत शहरी नगर नियोजन /पालिकेच्या अधिकार क्षेत्राशी निगडीत मुद्द्यांवर नवीन धोरण लवकरच सुरू करण्यात येईल.

संबंधित विषय