Advertisement

तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत


तब्बल अडीच तासांनी मुंबईतील वीजपुरवठा सुरुळीत
SHARES

ग्रीड फेल्युअर झाल्यामुळं मुंबईतीळ वीजपुरवठा सोमवारी सकाळी खंडित झाला होता. अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळं मुंबई लोकलसह सर्वच यंत्रणांना त्याचा फटका बसला. मात्र, जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळानंतर मुंबईतील वीजपुरवठा पुन्हा सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे.  वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल वाहतूकही पूर्वपदावर येत आहे.

सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला. लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाला होता. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत.

याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करुन अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सूचना दिल्या. तसंच, या सर्व काळात वीजपुरवठा खंडित असल्यानं इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावं व तात्काळ मदत करावी असंही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले.

उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा