Advertisement

पालघर आणि वसई-विरारच्या पूरग्रस्तांना मदत जाहीर

पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.

पालघर आणि वसई-विरारच्या पूरग्रस्तांना मदत जाहीर
SHARES

गेल्या महिन्यात पालघर (palghar) आणि वसई-विरार (vasai-virar) शहरात मुसळधार पावसाने (heavy rain) हाहाकर उडवला होता. वसई-विरारमधील (virar) अनके भाग तब्बल 3 ते 4 दिवस पाण्याखाली होते.

यावेळी अनेक इमारतीतील तळमजल्यावरील घरात पाणी गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले.

पालघरमधील अनेक गावात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचे खूप मोठे नुकसान झाले. अनेकांची घरे, गाईगुरे वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले.

यामुळे आता अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पालघर तसेच वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पूरग्रस्तांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

यानुसार घरगुती भांडी, कपडे, पशुधन यांच्या नुकसानीपोटी तसेच दुकानदार, टपरीधारक यांनाही मदत दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी 28 जुलै रोजीच्या बैठकीत पालघर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता.  या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मदत घोषित केली.

त्यानुसार पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला कपड्यांच्या नुकसानीसाठी 10 हजार तसेच घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीपोटी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

पूर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या अथवा कच्च्या घरासाठी दीड लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे.



हेही वाचा

तांत्रिक बिघाडामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुसळधार पावसामुळे भिवंडीत पूर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा