Advertisement

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील विद्यार्थ्याचा मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप

जाब विचारत विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल ओपीडी बंद केली आहे.

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील विद्यार्थ्याचा मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप
SHARES

मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जाब विचारत विद्यार्थ्यांनी हॉस्पिटल ओपीडी बंद केली आहे. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे.

मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेदिक  हॉस्पिटलमध्ये BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे (22)  या विद्यार्थ्याला त्याच हॉस्पिटलमध्ये जीव गमवावा लागला आहे. रात्री झाडावरुन पडून त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती.

मात्र या विद्यार्थ्यावर वेळत उपचार मिळू शकलेले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे या विद्यार्थ्याचा जीव गेला आहे, असा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झालेत. 

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आरोप केला आहे. वैद्यकीय महाविद्यालयात मुले सुरक्षित नसल्याचे सिद्ध होत आहे. या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांच्यामध्ये असंतोष असून डिन यांनी त्या जखमी विद्यार्थ्यांसाठी साधी रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली नाही.

तसेच उपचारासाठी त्याला स्पर्श देखील केला नाही. वेळेवर उपचार न मिळाल्याने या विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला आहे, असा आरोप करण्यात आला आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा