Advertisement

मुंबईच्या स्वच्छतेसाठी एएलएमचा अभिनव ध्यास


मुंबईच्या स्वच्छतेसाठी एएलएमचा अभिनव ध्यास
SHARES

मुंबई शहरात सर्वत्रच मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. पण महापालिकेच्या प्रगत परिसर व्यवस्थापन (एएलएम) या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

आपला परिसर कचरामुक्त करण्यासाठी मलबार हिल इथल्या लिट्ल गिब्स रोड क्रमांक 1, 2 आणि 3 येथील आठ महिलांसह चेल्ला चिदंबरमच्या संस्थापिका, अध्यक्ष आणि सचिव इंद्राणी मलकानी 2000 साली एएलएम या अभियानात सहभागी झाल्या. अशा प्रकारे त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवत मुलांना एक आरोग्यदायी जीवन देत त्यावेळचे पालिकेचे अध्यक्ष एम. एल. नलिनाक्ष यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण केली.

खरंतर एएलएम ही संकल्पना 1998 मध्ये राबवण्यात आली. त्यावेळी घाटकोपरमधील जोशी लेनमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. त्यामुळे तिथले रहिवासी त्रस्त झाले होते. हे पाहून तिथल्या एका रहिवाशाने बदल करण्याचे ठरवून महापालिकेशी भागीदारी करत प्रगत परिसर व्यवस्थापन (एएलएम) ही संकल्पना राबवली.

यामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि कचऱ्याची विल्हेवाट ही समस्या सोडवण्यासाठी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली. त्यानंतर ही संकल्पना पुढे वाढत गेली आणि आता मुंबईभर एएलएमचे 276 ग्रुप स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा