SHARE

मुंबई - मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकेच्या मागणीसाठी पालिका अभियंत्यांनी पुकारलेला संप शुक्रवारी स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री, पालिका आयुक्त आणि पोलिसांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्याने हा संप गुरूवारपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे म्युन्सिपल इंजिनियर्स असोसिएशनचे सुखदेव काशीद यांनी सांगितले.

"सध्या सणासुदीचे दिवस असल्याने हा संप गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. मात्र गुरुवारपर्यंत देशपांडे आणि धुरी यांना अटक झाली नाही, तसेच आपल्या मागण्यांचा योग्य तो विचार केला गेला नाही तर अभियंते पुन्हा संपावर जातील", असा इशारा असोसिएशनने दिला आहे.
देशपांडे आणि धुरी यांनी अटक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही संघटनेकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांना काही कागदपत्रे हवी होती, ती कागदपत्रे देण्यात आली असून, त्यानुसार पोलिस देशपांडे आणि धुरी यांना अटक करण्याच्या कामाला लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र देशपांडे आणि धुरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता या दोघांचेही मोबाईल बंद आहेत. हिम्मत असेल तर अटक करा असे सांगणारे आता फोन बंद करून गायब का झाले असा प्रश्नही आता अभियंत्यांकडून विचारला जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या