Advertisement

अंधेरीतील गोखले पूल बंद, नागरिकांना मेट्रोचा पर्याय

पूल पुढील दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे.

अंधेरीतील गोखले पूल बंद, नागरिकांना मेट्रोचा पर्याय
SHARES

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल सोमवार (आजपासून) वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा पूल पुढील दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे. पूल जरी बंद करण्यात आला असला तरी प्रवाशांना मेट्रोचा पर्याय आहे.

याच कारणास्तव मेट्रो १ च्या (घाटकोपर-वर्सोवा) प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसाला २० हजार प्रवासी वाढण्याची शक्यता असून यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) मेट्रोच्या गाड्या आणि फेऱ्या वाढविण्यासाठी विचार सुरू केला आहे. लवकरच यासंबंधीचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

गोखले पूल हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा काही भाग २०१८ मध्ये कोसळला होता. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.

मोरबी दुर्घटनेनंतर धोकादायक असा गोखले पूल तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार पुढील आठवड्यापासून हा पूल दोन वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. हा पूल बंद झाल्यास अंधेरी पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. अशावेळी या प्रवाशांसाठी मेट्रो १ चा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मेट्रो १ चे दिवसाला २० हजार प्रवासी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी गाड्या आणि फेऱ्या वाढवण्याचा विचार एमएमओपीएलने सुरू केला आहे.



हेही वाचा

Mumbai Traffic Update: गोखले रोड पूल आजपासून बंद, हे ६ पर्यायी मार्ग वापरा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा