Advertisement

कोरोनानंतर 'या' आजाराचा धोका? २ जणांचा मृत्यू

एक सावधान करणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाच्या लाटेनंतर एका अदृश्य शत्रूनं देशातील डॉक्टरांचे टेन्शन वाढविलं आहे.

कोरोनानंतर 'या' आजाराचा धोका? २ जणांचा मृत्यू
SHARES

गतवर्षी मुंबईसह राज्यभरात कोरोनाच्या महामारीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांनी अनेक उपाय योजना सुरू केल्या. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जातो. त्यामुळं देशभरातील नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे. मात्र, असं असलं तरी एक सावधान करणारी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाच्या लाटेनंतर एका अदृश्य शत्रूनं देशातील डॉक्टरांचे टेन्शन वाढविलं आहे.

‘एस्परजिलियस लेंटुलस’ नावाची ही बुरशी असून त्याच्या संसर्गामुळं दिल्लीत २ जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेचं कारण म्हणजे कोणत्याही औषधांना ही बुरशी जुमानत नाही. त्यामुळे एक नवेच संकट उभं ठाकलं आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगसचा संसर्ग होत असल्याचं आढळून आले होतं. आता एस्परजिलियस लेंटुलस या बुरशीचा संसर्ग आढळून आला आहे.

ही बुरशी फुफ्फुसावर परिणाम करते. सर्वप्रथम २००५ मध्ये बुरशीची ओळख पटली होती. तेव्हापासून अनेक देशांमध्ये एस्परजिलियस लेंटुलसचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात या बुरशीचे रुग्ण प्रथमच आढळले आहेत. दिल्लीत इंडियन जर्नल ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार या बुरशीमुळे मृत्युमुखी पडलेल्या एका रुग्णाचे वय ५० ते ६० वर्षे होते, तर दुसऱ्या रुग्णाचे वय ४५ वर्षांहून कमी होते. दोघांनाही क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचं निदान करण्यात आलं होतं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा