सिद्धिविनायक न्यासातर्फे दागिन्यांचा लिलाव, भाविकांचा उत्फूर्त प्रतिसाद

 Prabhadevi
सिद्धिविनायक न्यासातर्फे दागिन्यांचा लिलाव, भाविकांचा उत्फूर्त प्रतिसाद

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सिद्धिविनायक मंदिरात गणेश भक्तांनी अर्पण केलेल्या अलंकरांचा लिलाव मंदिर न्यासातर्फे करण्यात आला. या लिलावास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लिलावामध्ये एकूण 786 ग्रॅम 109 मिलिग्रॅम वजनाच्या 112 वस्तूंचा लिलाव झाला. यामध्ये हार, लॉकेट, चेन, नाणी या गणपतीला अर्पित केलेल्या अलंकारांचा लिलाव करण्यात आला.

या लिलावामधून न्यासाला 23,65,824 इतकी रक्कम मिळाली. सदर लिलावाच्या वेळी न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र राणे, कोषाध्यक्ष निर्मला प्रभावळकर, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, न्यासाचे सोने चांदी, लेखाविभागातील कर्मचारी उपरस्थित होते. आता पुढील लिलाव 9 जुलै रोजी गुरुपौर्णिमेला होणार आहे.

Loading Comments