Advertisement

बॅकांची कामे गुरूवारपर्यंत उरकून घ्या, सलग तीन दिवस राहणार बॅका बंद


बॅकांची कामे गुरूवारपर्यंत उरकून घ्या, सलग तीन दिवस राहणार बॅका बंद
SHARES

नवीन वर्षानिमित्त जर आपण बाहेर जाण्याचे नियोजन करत असाल,  अथवा रोखीने व्यवहार करणार असाल. तर तुम्हच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या आठवड्यात सलग तीन दिवस सुट्या आल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तीन दिवसांनंतर एटीएममध्ये पैशांचा तुटवडा जाणवेल. यामुळे आताच रोख रक्कम काढून घ्या.

हेही वाचाः- उर्मिलाच्या इन्स्टाग्राम हॅक प्रकरणी गुन्हा दाखल

वर्षा अखेरीस कोरोनानंतर परिस्थिती रुळावर येत असताना लोकांकडून ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांकडून मित्र परिवारासोबत पर्यटन करण्याच्या योजना आखल्या जातात. या दरम्यान बँकांमध्ये अनेक काम उरकण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. तर आता हि गर्दी आणखी वाढू शकते कारण सलग तीन दिवस बँक बंद राहणार आहेत.या आठवड्यात सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे नववर्ष साजरं करण्यासाठी कुठे बाहेरगावी जात असाल किंवा तुम्हाला रोखीच व्यवहार करायचे असतील तर ते गुरुवारपर्यंतच उरकून घ्यावे लागणार आहेत. २५ डिसेंबरला नाताळची सुट्टी आणि २६,२७ डिसेंबर चौथा शनिवार रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात सलग तीन दिवस बॅंकांना सुट्टी असणार आहे. तसंच नवं वर्ष सुरु होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. त्यामुळे बॅकेशी संबंधित व्यवहार वेळेत पूर्ण करावे लागणार आहेत.

हेही वाचाः- पंचतारांकित हॉटेलमधील पबवर पोलिसांची कारवाई, बड्या सेलिब्रिटींवर कारवाई

याव्यतिरिक्त, देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका सलग ९ दिवस बंद राहणार आहे. ही माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. शिलाँग आणि मिझोरमची राजधानी ऐझॉलमध्ये २४ डिसेंबर २०२० रोजी ख्रिसमस इव्हच्या निमित्ताने बँका बंद राहणार आहे. त्यानंतर २५ डिसेंबरला ख्रिसमस आणि २६ डिसेंबरला शिलाँग प्रांतात बँक बंद राहणार. २७ डिसेंबर रोजी रविवारची सुट्टी असेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा