Advertisement

'लवकरच बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार'


'लवकरच बीडीडी चाळींचा पुनर्विकास होणार'
SHARES

मुंबई - बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी खुशखबर आहे. लवकरच एन. एम. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ आणि नायगावमधील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाणार आहे, अशी माहिती गृह निर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत दिली.

तर तांत्रिक गोष्टीमुळे वरळी बीडीडी चाळीची निविदा रद्द झाली होती, सोमवारी पुन्हा कंत्राट नेमण्यासाठी ई टेंडर काढण्यात येणार आहे. वरळी बीडीडी चाळ कंत्राटदार निश्चित करण्यासाठी एक महिना लागणार आहे. नायगावमधील बीडीडी चाळीचा पुनर्विकास शापुरजी पालनजी आणि एन. एम. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास एल अँड टी कंपनीकडून करण्यात येणार असून पुनर्विकास झाल्यानंतर इथल्या रहिवाशांना सुमारे 500 चौरस फूट घर मिळेल. असंही रवींद्र वायकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा