Advertisement

सरकारी बाबूंचा कामचुकारपणा उघड


SHARES

मुंबई - सरकारी काम नी सहा महिने थांब. ही म्हण सरकारी बाबुंसाठी पुन्हा एकदा खरी ठरलीय. याचा प्रत्यय आलाय अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारभारातून. सहआयुक्त दक्षता विभागानं सप्टेंबरमध्ये अस्थापनाच्या कामांची तपासणी केली. तेव्हा 37 फायलींमध्ये दफ्तरदिरंगाई झाल्याचं समोर आलं. याचा अहवालही ‘मुंबई लाइव्ह’च्या हाती लागलाय. हा अहवाल एफडीए आयुक्तांपासून सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव आणि गृह विभागाला सादर करून आज एक महिना उलटला. पण, या अहवालाची अंमलबजावणी झाली नसल्याचं उघड झालंय. सरकार या अहवालाकडे काणाडोळा करत सरकारी बाबूंना पाठिशी घालतेय का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. तर अहवाल तयार करून आयुक्त आणि इतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला असल्याची प्रतिक्रीया सहआयुक्त हरिश बैजल यांनी दिली. तर आपण नागपुरात अधिवेशनात असल्याचं सांगत विधी आयुक्त साधवानी यांनी बोलण्यास नकार दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा