Advertisement

पालिकेच्या 'या' प्रमुख रुग्णालयांतून घ्या राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ


पालिकेच्या 'या' प्रमुख रुग्णालयांतून घ्या राजीव गांधी आरोग्य योजनेचा लाभ
SHARES

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना राजीव गांधी आरोग योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आजवर सक्षम मदत केंद्र नव्हते. पण आता हे तिन्ही रुग्णालये खासगी संस्थेच्या मदतीने मदत केंद्र उभारून क्लेम मॅनेजमेंट अँड सेटलमेंट सर्व्हिसची सेवा उपलब्ध करून देणार आहे.

मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव आणि नायर या तिन्ही रुग्णालयात राजीव गांधी आरोग्य योजनेंतर्गत कामकाजासाठी खासगी संस्थेच्या डेटा एंट्री ऑपरेटरची मदत घेऊन सेवा दिली जात असे.


रुग्णांची गैरसोय होणार दूर

पण या योजनेतंर्गत केली जाणारी रुग्णांची एकंदरीत तपासणी, शस्त्रक्रीया इत्यादी माहिती तसेच याबाबतच्या त्रुटी आणि क्लेम सेटल संबंधितच सिमित होती. त्यामुळे बऱ्याचवेळा महापालिकेच्यावतीने सेवा देऊनही क्लेम सेटल न झाल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. परिणामी महापालिकेच्या तिजोरीवरीलही भार पडत होता. खर्च केलेला पैसा हा या योजनेतंर्गत महापालिकेच्या तिजोरीत योग्य प्रमाणात जमा होत नव्हता. त्यामुळे अखेर महापालिकेने यासाठी आता खासगी संस्थेला नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.


'या' कंपनीची केली निवड

त्यामुळे महापालिकेने राजीव गांधी आरोग्य योजनेंतर्गत क्लेम मॅनेजमेंट अँड सेटलमेंट सर्व्हिस देण्यासाठी सी. एस. क्रियेटिव्ह सोल्यूशन या कंपनीची निवड केली आहे. राजीव गांधी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांवर करण्यात येणाऱ्या खर्चापोटी महापालिकेच्या तिजोरीत वर्षाला ३० कोटी याप्रमाणे दोन वर्षांसाठी सुमारे ६० कोटी रुपयांचा निधी जमा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करून त्यांना पुढील दोन वर्षांसाठी १ कोटी २३ लाख ४ हजार रुपये एवढ्या रकमेचे कंत्राट करार करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा