मुंबई होणार सीसीटीव्हीत कैद


SHARE

मुंबई - मुंबई शहरातील सव्वा कोटी नागरीकांची सुरक्षितता लक्षात घेता दोन ऑक्टोबरला सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण सोहळा आहे. सायन येथील षण्मुखानंद सभागृहात लोकार्पण होणार असल्याची माहिती विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली आहे.

यावेळी सेवा हमी कायद्यांतर्गत 163 नवीन सेवा ऑनलाइन करणे, नागपूर जिल्हा डिजिटल जिल्हा घोषित करणे आणि अवैध मद्य निर्मूलनाचा कृती आराखडा विमोचन या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अण्णा हजारे,शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, दीपक केसरकर, विजय देशमुख, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित राहणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या