Advertisement

डबेवाल्यांसाठी रेल्वे स्थानकाबाहेर सायकल स्टँड


डबेवाल्यांसाठी रेल्वे स्थानकाबाहेर सायकल स्टँड
SHARES

गेली अनेक वर्षे चाकरमान्यांची भूक भागवण्याचं काम करणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांकरता रेल्वे स्थानकाबाहेर सायकल स्टँड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.


पालिकेच्या महासभेत मागणी

सायकल आणि रेल्वेच्या माध्यमातून डबेवाले चाकरमान्यांपर्यंत जेवणाचे डबे पोहचवण्याचं काम करतात. मात्र सायकलने डबे पोहचवत असताना काही रेल्वे स्थानकांबाहेर सायकली उभ्या करण्याची सुविधा नसल्याने, त्यांना गर्दीच्या वेळी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाहेरील महापालिकेच्या जागेवर डबेवाल्यांसाठी सायकल स्टँड उभारण्यात यावं, अशी मागणी पालिकेच्या महासभेत करण्यात आली आहे.


दत्ता नरवणकर यांची मागणी

दररोज लाखोंच्या संख्येत जेवणाचे डबे चर्चगेट ते विरार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण आणि नवी मुंबई येथील विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयांमध्ये डबेवाले पोहोचवत असतात. यावेळी प्रामुख्यानं डबेवाले रेल्वे आणि सायकलच्या माध्यमातून डबे पोहचवत असतात.

मात्र, काही वेळा रेल्वे स्थानकाबाहेर होणाऱ्या गर्दीमुळे त्यांना तसंच, स्थानकाबाहेर सायकल स्टॅंड नसल्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागतो. डबेवाल्यांची ही समस्या सोडवण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर सायकल स्टँड उभारण्याची मागणी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा