Advertisement

सर्व कर्मचाऱ्यांनी समान काम करावे म्हणूनच बायोमेट्रीक हजेरी


सर्व कर्मचाऱ्यांनी समान काम करावे म्हणूनच बायोमेट्रीक हजेरी
SHARES

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रीक हजेरीला विरेाध होत असला तरी ही यंत्रणा राबवलीच जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कामांचे तास हे ठरलेले असून काही कर्मचारी फक्त दोन तास, तीन तास आणि पाच तासच काम करतात. तर काही दहा-बारा तास काम करतात. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी समान काम करावे, याचसाठी ही यंत्रणा बसवली असल्याचं त्यांनी सांगितलं.


१ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांनी नोंदवली बायोमेट्रीक हजेरी 

मुंबई महापालिकेतील सुमारे १ लाख ४ हजार कर्मचाऱ्यांची हजेरीही बायोमेट्रीक प्रणालीद्वारे नोंदवली जात आहे. या हजेरीमुळे मागील महिन्यात काही कर्मचाऱ्यांचे पगार कापले गेले ही वस्तुस्थिती आहे. परंतु यापुढे अशाप्रकारे कोणत्याही कामगारांचे पगार कापले अथवा रोखले जावू नये, अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. ज्या कामगार, कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचा प्रश्न आहे, त्यांना त्या महिन्याचा पगार दिला जावा आणि त्यांना एक महिन्याच्या आत याबाबतचे स्पष्टीकरण देण्यास सांगावे. त्यांच्या स्पष्टीकरणानंतरच पुढील कार्यवाही केली जावी, अशा सूचना केलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

बायेामेट्रीक हजेरीला सर्वांनीच पाठिंबा द्यावा, असं आवाहन करत महापालिकेच्या कोणत्याही कामगारांवर या प्रणालीचा अवलंब केल्यास अन्याय होत नसल्याचेही त्यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा