Advertisement

पुलांच्या कामांसाठी महापालिका रेल्वेला देणार 'इतके' कोटी रुपये

मुंबई महापालिका रेल्वे मार्गावरील पुलांच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाला तब्बल ७०० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळं पुलांचं काम करणं सुलभ होणार आहे.

पुलांच्या कामांसाठी महापालिका रेल्वेला देणार 'इतके' कोटी रुपये
SHARES

मुंबई महापालिका रेल्वे मार्गावरील पुलांच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाला तब्बल ७०० कोटी रुपये देणार आहे. त्यामुळं पुलांचं काम करणं सुलभ होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पादचारी पुलांची बांधणी करणं, लोअर परेल येथील रेल्वे पूल, फेरार रेल्वेपुलावर पुन्हा गर्डर टाकणं, भायखळा रेल्वे पुलाचं काम आदी कामांसाठी रेल्वे प्रशासनानं मुंबई महापालिकेकडं तब्बल ७०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेनं रेल्वेला सदर रक्कम देण्यासाठी २०२०-२१ च्या सुधारित अर्थसंकल्पात २०० कोटी रुपयांची तर २०२१-२२ च्या अर्थसंकल्पातही २०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी काळात रेल्वे मार्गावरील ११ पूल आणि एक भुयारी वाहतूक मार्ग यांच्या पुनर्बांधणीचे काम 'महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.' या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

टिळक रेल्वे लाईन पूल आणि रे रोड रेल्वे लाईन पूल या पुलांच्या सर्वसाधारण आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. या पुलांचं पुनर्बांधकाम येत्या ३ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा