Advertisement

मुंबईतला कचरा २३०० मेट्रीक टनानं घटला; पालिका प्रशासनाचा पुन्हा दावा

महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्यावतीनं कचरा कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत २०१५ मध्ये जो सरासरी ९ हजार ५०० टन कचरा उचलला जात होता त्याचं प्रमाण आता ७ हजार २०० मेट्रीक टनांच्याही खाली आल्याचा दावा प्रशासनानं केला अाहे.

मुंबईतला कचरा २३०० मेट्रीक टनानं घटला; पालिका प्रशासनाचा पुन्हा दावा
SHARES

मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा पुन्हा एकदा महापालिका प्रशासनानं केला अाहे.  मागील एक वर्षांत १ हजार ७५७ गाड्यांच्या फेऱ्यात घट झाल्याची आकडेवारी सादर करत प्रशासनानं कचऱ्याचं प्रमाण कमी झाल्याचा दावा केला.


स्वतःच पाठ थोपटली

सध्या महापालिकेच्यावतीनं नियुक्त करण्यात आलेले जुनेच कंत्राटदार असून या कंत्राटदारांवरच कचऱ्यात डेब्रीज भेसळ घोटाळ्याचा आरोप होता. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतरच गाड्यांच्या फेऱ्यात लक्षणीय घट दिसून येऊ लागली आहे. कचऱ्यामुळे ही घट झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात डेब्रीज भेसळला लगाम बसल्यामुळे तसंच कंत्राटदारांमध्ये भीती निर्माण झाल्यामुळे ही घट दिसून येत असल्याचं बोललं जातं. परंतु प्रशासन कचऱ्याचं प्रमाण कमी झाल्याचं सांगत आपली पाठ थोपटवून घेत आहे.


पालिकेकडून जनजागृती

मुंबईतील कचऱ्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी महापालिकेच्यावतीनं सातत्यानं प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्यावतीनं कचरा कमी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत २०१५ मध्ये जो सरासरी ९ हजार ५०० टन कचरा उचलला जात होता त्याचं प्रमाण आता ७ हजार २०० मेट्रीक टनांच्याही खाली आल्याचा दावा प्रशासनानं केला अाहे. कचऱ्याचं हे प्रमाण कमी झाल्यानं कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्याही कमी झाल्या आहेत.


फेऱ्या घटल्या

याबाबत गेल्यावर्षीच्या व यावर्षीच्या जून महिन्याची तुलनात्मक आकडेवारी सादर करून प्रशासनाने हा दावा केला अाहे.  जून २०१७ मध्ये कचरा वाहून नेणाऱ्या मोठ्या गाड्यांच्या १७ हजार ९९१ फेऱ्या झाल्या होत्या. यामध्ये जून २०१८ मध्ये १ हजार ७५७ एवढी घट होऊन १६ हजार २३४ एवढ्या फेऱ्या झाल्या आहेत. जून २०१७ मध्ये कचरा वाहून नेणाऱ्या लहान गाड्यांच्या १० हजार ९५१ फेऱ्या झाल्या होत्या. 

परंतु जून २०१८ मध्ये या गाड्यांची संख्या १० हजार १९५ एवढी झाली आहे. त्यामुळे या एक वर्षांत लहान गाड्यांच्या फेऱ्या ७५६ ने कमी झाल्या आहेत.  तर जून २०१७ मध्ये कचरा वाहून नेणाऱ्या छोट्या बंदिस्त गाड्यांच्या १६ हजार २८५ फेऱ्या झाल्या होत्या. आता जून २०१८ मध्ये या गाड्यांच्या फेऱ्या १५ हजार ३६८ एवढ्या झाल्या आहेत. त्यामुळे या कालावधीत तब्बल ९१७ ने फेऱ्यांमध्ये घट झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय.



हेही वाचा - 

'एमएमआरसी'कडून आरेत बेकायदा बांधकाम? पर्यावरणप्रेमींकडून तक्रारीवर तक्रारी दाखल

राज्यातील कॉलेज शिक्षकांची जेलभरो आंदोलनाची हाक!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा