Advertisement

ऑक्टोबरअखेपर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे पालिकेचे लक्ष्य

मुंबईत ५३ टक्के नागरिकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

ऑक्टोबरअखेपर्यंत १०० टक्के लसीकरण करण्याचे पालिकेचे लक्ष्य
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. मुंबईत सुमारे ९४ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून ऑक्टोबरअखेपर्यंत म्हणजेच दिवाळीपूर्वी पहिली मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट महापालिकेनं निश्चित केले आहे. मुंबईत ५३ टक्के नागरिकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

मुंबईत सिनेमागृहापासून ते शाळा, महाविद्यालये, दुकानांवरील शिथिल केलेले निर्बंध आणि दुसरीकडे आगामी दिवाळी सणाच्या निमित्तानं शहरात होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दिवाळीपूर्वी किमान पहिल्या मात्रेचे प्रमाण १०० टक्के करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवलेले आहे.

लसीकरण घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांतील झोपडपट्ट्या, काही इमारतींच्या आवारात आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना महापालिकेनं विभागीय साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. तसंच लसीकरणासाठी अत्यावश्यक सेवायुक्त फिरत्या रुग्णवाहिकाही पालिकेने कार्यरत केल्या आहेत.

मुंबईत पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण आता जवळपास ९४ टक्के झाले आहे. हे प्रमाण ऑक्टोबरअखेपर्यंत १०० टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागांना दिलेल्या सूचनेनुसार अंधेरी पश्चिम, दहिसर, कुलाबा  आणि आसपासच्या परिसरांमध्ये आवश्यकतेनुसार इमारती, झोपडपट्टय़ांमध्येही लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईतील अन्य भागांमध्येही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आसपासच्या शहरांतील नागरिकांनी मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लस घेतली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा