गणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज

 Pali Hill
गणेश विसर्जनासाठी पालिका सज्ज

मुंबई- मुंबईत आज सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह असणार आहे. यासाठी पालिका सज्ज झाल्याची माहिती महापौर स्नेहल आंबेकर यांनी दिलीय. मुंबईतील 59 नैसर्गिक तर 31 कृत्रिम तलाव अशा 100 ठिकाणी विसर्जन होणार आहे. या विसर्जन ठिकाणी विसर्जन होईपर्यंत पालिकेचे 5173 कर्मचारी तर 2382 अधिकारी कार्यरत असणार आहेत. पालिकेकडून विसर्जन ठिकाणी 840 स्टील्ट प्लेट, 58 जीवरक्षक, 81 मोटरबोट, 74 प्रथमोपचार केंद्र, 60 रुग्णावाहिका, 118 शौचालये, 201 निर्माल्य कलश, 1991 प्रकाशझोत, 1306 नियंत्रण मनोरे तर 48 जर्मन तराफे अशी व्यवस्था करण्यात आलीय.

समुद्र किना-यावर स्टिंग रे आणि जेली फिश मासे आढळले आहेत. त्यामुळे विसर्जन स्थळी जाताना भक्तांनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहनही महापौरांनी केले आहे. पाण्यात जाताना गमबुट घालून जावे, उघड्या अंगाने पाण्यात जाऊ नये, असेही आवाहन केले आहे. स्टिंग रे आणि जेली फिश माशांनी दंश केलेल्या रूग्णांना त्वरीत उपचार मिळावेत यासाठीही विसर्जन ठिकाणी वैदयकिय सुविधा पुरवण्यात आली आहे.

Loading Comments