आम्ही माणसं नाहीत का ?

नरीमन पॉईंट - एकीकडे मंत्रालय परिसरात राहणारे धनाढ्य आहेत तर दुसरीकडे सामान्य नागरिक. यशोधन इमारतीत राहणा-या धनाढ्यांवर पालिका जरा जास्तच मेहरबान आहे. पण मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे पालिकेनं पाठ फिरवलीय. जय भवानी रहिवासी सेवा संघ या वसाहतीत डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ पसरलीय.

आयएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या यशोधन इमारत परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यानंतर तात्काळ औषध फवारणी करण्यात आली. पण प्रत्यक्ष डेंग्युचे रूग्ण आढळणा-या जय भवानी वसाहतीकडे मात्र पालिकेचं गंभीर दुर्लक्ष होतंय..इथल्या भिंतींवर डेंग्यूविरोधात जनजागृतीचे पोस्टर लावण्यापलीकडे पालिकेची कारवाई गेली नाही. त्यामुळे आम्ही माणसं नाहीत का असा सवाल इथल्या रहिवाशांकडून केला जाऊ लागलाय..

Loading Comments