पालिकेची इमारत विद्युत रोषणाईनं झळाळणार

 Fort
पालिकेची इमारत विद्युत रोषणाईनं झळाळणार

सीएसटी - महापालिकेची ऐतिहासिक इमारत आता विद्युत रोषणाईनं झळाळणार आहे. महापालिकेनं हा निर्णय घेतलाय. यासाठी सुमारे सव्वा आठ कोटी रूपयांचा खर्च करण्यात येणाराय. त्यामुळे सीएसटीप्रमाणेच आता महापालिकेची ऐतिहासिक इमारतही विद्युत रोषणाईनं झळाळणार आहे. बुधवार १४ डिसेंबरच्या स्थायी समितीत हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

यासाठी प्रकल्प व्यस्थापन सल्लागार म्हणून आभा नारायण लाभा असोसिएटस यांची नियुक्ती करण्यात आलीय. महापालिका मुख्यालयाच्या जुन्या आणि विस्तारीत इमारतीच्या दर्शनी भागावर वेगवेगळया रंगछटेची विद्युत रोषणाई करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. मेसर्स वॉच डॉग सिक्युरिटी यांची कमी दराची निविदा पालिकेला देण्यात आलीय.

तसंच महापालिकेच्या इमारतीशिवाय सर फिरोजशहा यांच्या पुतळ्यालाही रोषणाई करण्यात येणाराय.

Loading Comments