पालिका मालामाल

 Pali Hill
पालिका मालामाल

मुंबई – गेल्या तीन दिवसांत मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत 97 कोटी रुपयांची भर पडली आहे. मालमत्ता कर, पाणी बिल आणि इतरसेवा शुल्क 500, एक हजारच्या जुन्या नोटा गेल्या तीन दिवसांपासून पालिकेकडून स्वीकारलं जात आहे. सुट्टीच्या दिवशीही करांची वसुली सुरू असून रात्री 12 वाजेपर्यंत ही वसुली होत आहे. याचा फायदा पालिकेला होताना दिसत आहे. त्यामुळेच तीन दिवसांत 97 कोटी रुपयांची करवसुली जमा झाली असून सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत करवसुली सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनं दिली. त्यामुळे पालिकेची करवसुली 100 कोटींचा आकडा पार करणार हे निश्चित.

Loading Comments