अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

 Mumbai
अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
See all

देवनार - सायन-ट्रॉम्बे मार्गावरील देवनार डेपो समोर असलेल्या तीन झोपड्यांवर गुरुवारी पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाकडून तोडक कारवाई करण्यात आली. रस्त्याच्या कडेलाच या झोपड्या असल्याने त्या वाहतूकीला अडथळा ठरत होत्या. यापूर्वी देखील या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा या झोपड्या उभ्या राहिल्याने कडक पोलीस बंदोबस्तामध्ये गुरुवारी या तीन झोपड्या जमिनदोस्त करण्यात आल्या. पालिकेच्या या कारवाईमुळे मात्र सायन-ट्रॉम्बे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Loading Comments