Advertisement

कंगनावर दंडात्मक कारवाई करा, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

कंगनाची मागणी निराधार असून खोटी याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावरच दंडात्मक कारवाईची मागणी पालिकेत न्यायालयात केली आहे.

कंगनावर दंडात्मक कारवाई करा, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
SHARES

मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर कारवाई केली होती. या करावाईविरोधात तिने मुंबई पालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पालिकेकडं तिने २ कोटीं रुपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे. आता महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

कंगनाची मागणी निराधार असून खोटी याचिका दाखल केल्याबद्दल कंगनावरच दंडात्मक कारवाईची मागणी पालिकेत न्यायालयात केली आहे. पालिकेतर्फे एच पश्चिम वॉर्डाचे अधिकारी भाग्यवंत लोटे यांच्यावतीनं कंगनाच्या याचिकेला उत्तर देत पालिकेनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं आहे. पाली हिल इथल्या कार्यालयावर केलेल्या कारवाईनंतर कंगनानं पालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २२ सप्टेंबर रोजी या प्रकरणावर हायकोर्यात सुनावणी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईदरम्यान दुर्मिळ सामानांचं, वस्तूंचं नुकसान झाल्याचा आरोप कंगनानं केला आहे. एकूण मालमत्तेच्या ४० टक्के भागाचं नुकसान झाल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे .यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला गुरुवारपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

कंगनाला वांद्रे इथल्या तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 8 सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम ३५४ (अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती.

पण, तिच्याकडून कोणतंही उत्तर न आल्यानं पालिकेकडून ९ सप्टेंबर रोजी सकाळी तोडकाम करण्यात आले. कंगनाच्या कार्यालयात १२ अनधिकृत बांधकामं असल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केला होता. त्याला विरोध करत कंगनानं अॅड. रिझवान सिद्दीकीमार्फत हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. यानंतर कारवाईला स्थगिती मिळाली.कंगनाला वांद्रे इथल्या तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी मुंबई महानगरपालिका कायद्यातील कलम ३५४ (अ) नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर उत्तर देण्यासाठी कंगनाला २४ तासांची मुदत देण्यात आली होती.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय