Advertisement

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच अल्ट्रासाऊंड कलर डॉपलर मशीन


महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच अल्ट्रासाऊंड कलर डॉपलर मशीन
SHARES

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी १० अल्ट्रासाऊंड कलर डॉपलर मशीन यंत्राची खरेदी केली जाणार आहे. या सर्व मशीन्स केईएम, शीव, नायर रुग्णालयासह कुपर आणि बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मात्र निविदेमध्ये ज्या कंपनीला प्रशासनाने बाद केले होते, त्याच कंपनीला पुन्हा पात्र ठरवून महापालिकेने कंपनीची निवड केली आहे.

रुग्णाच्या शरीरातील अवयवांची तपासणी करण्यासाठी हाय अँड अल्ट्रासाऊंड कलर डॉपलर मशीनची खरेदी केली जात आहे. यासर्व मशिन्स दक्षिण कोरियातून मागवण्यात आल्या आहे. यासाठी सॅमसँग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी ८ कोटी ४० लाख रुपये खर्च केले जात आहेत. मशिन्सची खरेदी, उभारणी आणि पाच वर्षांची देखभाल यावर सुमारे साडेआठ कोटी रुपये खर्च केले जात आहे.

या मशीनच्या पुरवठ्यासाठी एकूण चार कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यातील मेसर्स ट्रीव्हीट्रॉन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्स यांनी निविदेमध्ये नमुद केलेले मॉडेलचे सीई प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्या निविदा बाद ठरवल्या होत्या. परंतु, या दोन्ही कंपन्यांनी मॉडेलचे सीई प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांच्या निविदा पात्र ठरवल्या. त्यामुळे कमी दरात आणि भारतीय चलनांमध्ये निविदा भरल्याने सॅमसंग कंपनीतर्फे या मशीनची खरेदी केली जात आहे. मात्र, निविदेच्या कालावधीत सीई प्रमाणपत्र सादर केलेले नसेल आणि ते प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर दिले जात असले तर निविदा अटींचा भंग ठरतो. त्यामुळे ही खरेदी तांत्रिक वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या रुग्णालयांना मिळणार मशीन्स

  • केईएम रुग्णालय : २ मशीन
  • शीव रुग्णालय : ३ मशीन
  • नायर रुग्णालय : २ मशीन
  • कुपर रुग्णालय : १ मशीन
  • बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालय : २ मशीन
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा