Advertisement

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचा 'तो' प्रकल्प महापालिकेनं केला रद्द

या प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईमुळं स्थानिकांची गैरसोय होत आहे. मुंबईतील जवळपास सर्वच झोपडपट्ट्यांना हीच समस्या भेडसावत आहे.

झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचा 'तो' प्रकल्प महापालिकेनं केला रद्द
SHARES

मुंबई महापालिकेनं झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांच्या जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याचा प्रकल्प रद्द केला आहे. मागील २ वर्षापूर्वी म्हणजे २०१९ साली या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पानुसार नागरी संस्थेला वर्षभरात २२,७७४ शौचालयं बांधायची होती. मात्र, ३ वर्षांनंतरही केवळ ५६ टक्के शौचालये बांधण्यात आली आहेत.

२०१७मध्ये महापालिकेनं जुन्या १४,१७३ शौचालयाच्या सीटच्या जागी १६,७०३ टॉयलेट सीट्स तयार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, २०१८ मध्ये निविदा प्रक्रिया झाली आणि वर्षभरानंतर २०१९ मध्ये स्थायी समितीनं या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी ४२२ कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते.

सार्वजनिक शौचालयाची सुविधा संबंधित स्थानिकांसाठी फार महत्वाचं आहे. मात्र, या प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईमुळं स्थानिकांची गैरसोय होत आहे. मुंबईतील जवळपास सर्वच झोपडपट्ट्यांना हीच समस्या भेडसावत आहे. असं असताना मात्र कंत्राटदारांनी कामाच्या दिरंगाईसाठी गतवर्षी आलेल्या कोरोना महामारीला जबाबदार धरलं आहे.

दरम्यान, ''परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून हा प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. शिवाय, अद्याप सुरूही न झालेल्या उर्वरित शौचालयांचं बांधकाम रद्द केले आहे'', असं उपमहापालिका आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा