कशी होणार डिजीटल मुंबई?

 Andheri
कशी होणार डिजीटल मुंबई?

अंधेरी - अंधेरीतल्या पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातली मशीन गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत धूळ खात पडलेली आहे. कार्यालयाच्या तळमजल्यावर असलेली ही मशीन कधी दुरुस्त होणार आणि प्रशासन अधिकाऱ्यांचं याकडे कधी लक्ष जाणार असा प्रश्न सामान्य मुंबईकरांना पडलाय. यातून राज्यासह मुंबईची माहिती नागरिकांना ऑनलाइन मिळत होती. सोबतच ई-मेल, पालिकेची वेबसाईट, परीक्षेचा निकाल, रेल्वे तिकीट, अॉनलाइन बँकिंग, नोकरी, बातम्या, शेअर मार्केट इत्यादी विषयांची माहितीसुद्धा नागरिकांना या मशीनवर सहजरित्या उपलब्ध होत होती.

काही तांत्रिक बिघाडामुळे ही मशीन बंद असल्याचं के-पूर्व विभागाचे उपायुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी सांगितलं. याशिवाय मशीन लवकरच दुरूस्त होऊन नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Loading Comments