Advertisement

नागरिकांच्या मदतीसाठी सर्व वॉर रूम राहणार अव्याहतपणे सुरू

कोरोना आणि ओमायक्रॉनबाधित, त्यांचे नातेवाईक, अतिजोखमीच्या, तसेच कमी जोखमीच्या गटांतील रुग्णांच्या मदतीसाठी मुंबई महापालिका मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्ष (वॉर रूम) अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी सर्व वॉर रूम राहणार अव्याहतपणे सुरू
SHARES

कोरोना आणि ओमायक्रॉनबाधित, त्यांचे नातेवाईक, अतिजोखमीच्या, तसेच कमी जोखमीच्या गटांतील रुग्णांच्या मदतीसाठी मुंबई महापालिका मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्ष (वॉर रूम) अव्याहतपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून रुग्ण वा त्यांच्या नेतावाईकांना मदत व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

नागरिकांनी आवश्यकता भासल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. कोरोना आणि त्याचे उत्परिवर्तित रूप ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे गेल्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्ष दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे ७ दिवस कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

या कक्षांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक सेवेतील अन्य कर्मचारी कार्यरत असतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांनी रुग्णांना तातडीने रुग्णशय्या उपलब्ध व्हावी, करोनासंबंधी विविध अडचणींबाबत थेट मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने महापालिकेने जून २०२० पासून विकेंद्रित पद्धतीने खाटा व्यवस्थापन प्रणाली अमलात आणली होती. ती आजतागायत अव्याहतपणे कार्यरत आहे.

महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या पातळीवर विभागीय नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत. करोनाबाधित रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक यांना करोनाबाबत मदत व मार्गदर्शन हवे असल्यास या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून आले आहे. 

या नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या मिळवून देणे, तसेच गृहविलगीकरणात असलेल्या बाधित रुग्णांना समुपदेशन करण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा