Advertisement

बिल्डरांना नो टेन्शन! पर्यावरणाच्या सर्व परवानग्या मुंबईतच मिळणार


बिल्डरांना नो टेन्शन! पर्यावरणाच्या सर्व परवानग्या मुंबईतच मिळणार
SHARES

मुंबईतील सर्व विकासकांमासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याच्या वतीने पर्यावरण परवानगी देण्यात येते. मात्र यापुढे २० हजार ते दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळातील बांधकामांना महापालिकेकडून ही परवानगी देण्यात येईल. त्यासाठी महापालिकेत पर्यावरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुंबईतूनच पर्यावरणाबाबतची परवानगी मिळणार असल्याने सरकारी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध पायाभूत प्रकल्पांसोबतच बिल्डरांनाही या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत विविध व्यवसायिक परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गत हा ‘पर्यावरण कक्ष’ सुरु करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे २० हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या बांधकाम प्रकल्पांना मुंबईतच परवानगी मिळविणे शक्य होणार आहे, असे विकासक नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी सांगितले.


अशी आहे तरतूद

मोठ्या बांधकाम प्रकल्पांना पर्यावरण विषयक परवानगी देण्याबाबत पडताळणी करण्याचे व अनुषंगिक अहवाल देण्याचे अधिकार या कक्षाला बहाल करण्यात आले आहेत. या कक्षाद्वारे देण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे संबंधित प्रकल्पाला पर्यावरण विषयक परवानगी देणे बंधनकारक असल्याचेही दराडे यांनी स्पष्ट केले.

  • या अंतर्गत ५ हजार ते २० हजार चौरस मीटर बांधकाम क्षेत्रफळ असणाऱ्या प्रकल्पांबाबत शासन मान्यताप्राप्त ‘क्वॉलिफाईड बिल्डिंग एन्व्हॉयर्नमेंट ऑडिटर’ यांच्यामार्फत पर्यावरण विषयक ‘स्वयं घोषणापत्र’ या कक्षाकडे सादर करावयाचे आहे.
  • यापेक्षा अधिक म्हणजेच २० हजार चौरस मीटर ते दीड लाख चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या बांधकाम प्रकल्पांबाबत संबंधित अधिसुचनेतील तरतुदींनुसार 'क्वॉलिफाईड बिल्डिंग एन्व्हॉयर्नमेंट ऑडिटर' यांनी पर्यावरण विषयक परवानगीबाबतचा अर्ज महापालिकेच्या प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांच्या कार्यालयाकडे सादर करावयाचा आहे.
  • दीड लाख चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम क्षेत्रफळ असणाऱ्या प्रकल्पांबाबत पर्यावरण विषयक परवानगी प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच केंद्र शासनाच्या स्तरावर होईल, अशीही माहिती दराडे यांनी दिली. कक्षाच्या रचनेनुसार यामध्ये ६ सदस्य आहेत. यापैकी ३ सदस्य हे महापालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी असून उर्वरित ३ सदस्य हे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.



हे देखील वाचा -

...हे आहे मुंबईतलं सर्वात महागडं घर



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा