मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे

 Dadar
मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे
मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे
मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे
मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे
मोदींच्या स्वागतासाठी फुटपाथ रिकामे
See all

दादर - 24 डिसेंबरला अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमीपूजन होणार आहे. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 22 डिसेंबरपासून मुंबई शहरातील सर्व फुटपाथ महापालिकेच्या वतीने रिकामे करण्यात आले आहेत. शुक्रवारी दिवसभरात महापालिकेचे कर्मचारी हे काम युद्ध पातळीवर करत असल्याचे दिसून आले. 22 डिसेंबरला माहिम परिसरात नाताळ निमित्त लावलेले स्टॉल देखील हटवण्यात आले. तर शुक्रवारी प्रभादेवी परिसरातील वडापाव,  भजीपावच्या गाड्यांसह अनेक गाड्या महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करत हटवलेल्या दिसून आल्या .

Loading Comments