Advertisement

मुंबईत अंथरुणास खिळलेल्यांचे घरोघरी लसीकरण सुरू

दीर्घ आजारपणामुळे, शारीरिक अपंगत्वामुळे अनेक लोक अंथरूणाला खिळून आहेत. या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही.

मुंबईत अंथरुणास खिळलेल्यांचे घरोघरी लसीकरण सुरू
SHARES

आजारपणामुळे अंथरुणास खिळून असलेल्या रुग्णांचं घरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणाची सुरूवात मुंबईत शुक्रवारपासून झाली. मुंबईत सुरुवातीला के पूर्व विभागातील अंधेरी, जोगेश्वरीचा पूर्वमध्येच प्रायोगिक तत्त्वावर हे लसीकरण करण्यात येणार आहे.

दीर्घ आजारपणामुळे, शारीरिक अपंगत्वामुळे अनेक लोक अंथरूणाला खिळून आहेत. या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन लस देण्याकरिता राज्य सरकारने चाचणी सुरू केली होती. अशा नागरिकांना घरी जाऊन लस देता येईल का याबाबतची पूर्वतयारी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू केली होती. त्यासाठी मुंबईतील अशा नागरिकांची माहिती गोळा करण्याचं कामही सुरू केलं होतं. 

हे लसीकरण करण्यासाठी पालिकेला राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहे. त्या आधारे हे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर के ले जाणार आहे. मुंबईत ४ हजार ४६६ व्यक्तींनी घरी लसीकरणासाठी नावे नोंदवली आहेत.

अंथरुणास खिळून असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करायचे असल्यास त्यांची  नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती  covidvaccsbedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे.

ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र, संबंधित व्यक्ती किं वा नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे आदेश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण केले जाणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा