Advertisement

'मिठी'सह नाल्यांच्या सफाईसाठी निविदा


'मिठी'सह नाल्यांच्या सफाईसाठी निविदा
SHARES

मुंबई - मुंबई महानगरपालिका मिठी नदीसह नाल्यांच्या साफसफाईला लागलीये. 2017च्या पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं वेळेत आणि योग्य प्रकारे व्हावेत, यासाठी महिन्यापूर्वीच महापालिकेनं नाले आणि मिठी नदीच्या सफाईसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार 350 किलोमीटर लांबीच्या एकूण 265 नाल्यांची आणि मिठी नदीची सफाई होणार आहे. या सर्व कामांसाठी 30 निविदा मागवण्यात आल्या होत्या. महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी गुरुवारी पर्जन्य जलवाहिनी खात्याच्या बैठकीत ही माहिती दिली.
गजदरबंध उदंचन केंद्र एप्रिलपासून सुरू
एच पश्चिम आणि के पश्चिम भागांतील पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी गजदरबंध उदंचन केंद्र बांधण्यात येतंय. या केंद्राच्या उभारणीचं कामही वेगात सुरू असून तांत्रिक कामं पूर्ण करत एप्रिलपर्यंत हे उदंचन केंद्र कार्यान्वित होईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली. हे उदंचन केंद्र सुरू झाल्यावर विर्लेपार्ले, सांताक्रूझ, खार, वांद्रे या परिसराला दिलासा मिळणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा