चौपाट्यांवर होणार मोबाइल शौचालयं

 Pali Hill
चौपाट्यांवर होणार मोबाइल शौचालयं

मुंबई - समुद्र किनारे आणि चौपाट्यांवर आता मोबाईल शौचालयं बांधण्यात येणार आहेत. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी शनिवारी घेतलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या मासिक आढावा बैठकीत मोबाइल शौचालयांबाबत निर्णय घेत यासंबंधीचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार सीएसआर निधीद्वारे आणि पालिकेच्या खर्चातून चांगल्या दर्जाची मोबाइल शौचालयं बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता गिरगाव, वरळी, दादर, बॅन्ड स्टॅन्ड, खारदांडा, जुहू, मढ, गोराई आदी ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना दिलासा मिळणार आहे. समुद्र किनारे आणि चौपाट्यांवर सागरी नियमांमुळे सार्वजनिक शौचालय उभारणं शक्य होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे पालिकेने आता सर्व समुद्र किनाऱ्यावर आणि चौपाट्यांवर फिरती किंवा मोबाईल शौचालयं बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading Comments