Advertisement

मुंबईत आता कंटेनरमध्ये अग्निशमन दलाचा कारभार


मुंबईत आता कंटेनरमध्ये अग्निशमन दलाचा कारभार
SHARES

मुंबईत झोपडपट्ट्यांची संख्या मोठी आहे. त्यातच चिंचोळे रस्ते यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आगीसारखी दुघर्टना घडल्यानंतर अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो. त्यामुळे आगीच्या घटना किंवा आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर त्वरीत उपाययोजना करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यासाठी छोटे अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे.


१७ छोटी अग्निशमन केंद्र

सध्या अस्तित्वात असलेल्या ३४ अग्निशमन दल केंद्राबरोबरच १७ छोटी अग्निशमन केंद्र उभारली जाणार आहेत. या छोट्या अग्निशमन दलाच्या केंद्राच्या बांधकामासाठी येणाऱ्या अडचणी आणि विलंब याचा विचार करताही केंद्र कंटेनरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनांसाठी शेड उभारून केंद्राचा कारभार हा कंटेनरमधून हाकला जाणार आहे.


कंटेनराईज्ड ऑफीसची खरेदी

काळबादेवी येथील गोकुळ निवास आगीच्या दुघर्टनेनंतर तत्कालिन अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली वस्तुस्थिती शोधक समितीनं छोटे अग्निशमन केंद्र उभारून त्यासाठी लागणारी वाहने (मिस्ट फायर इंजिन) त्वरीत खरेदी करून त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देण्यात यावे, अशी शिफारस केली होती. त्याकरता मुंबई अग्निशमन दलाने मिनी फायर टेंडर तसेच क्विक रिस्पॉन्स मल्टी पर्पज वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही वाहने लवकरच अग्निशमन दलाच्या ताफ्यात सहभागी होणार असून अग्निशमन केंद्रामध्ये तैनात करण्यात येणार आहे. या छोट्या अग्निशमन केंद्रांकरता कंटेनराईज्ड ऑफीस खरेदी करण्यात येत आहे.


काय असेल या केंद्रात?

या केंद्रांमध्ये वाहनांसाठी शेड बांधण्यात येणार आहे. तर कार्यालय हे कंटेनरमध्ये असेल, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली. यासाठी १७ कंटेनराईज्ड ऑफिसचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.


या ठिकाणी १७ छोटे अग्निशमन केंद्र

 • विभाग सी : भुलेश्वर, जगन्नाथ शंकरशेठ रोड,
 • विभाग डी : वाळकेश्वर जलाशय, मलबारहिल
 • विभाग डी : प्रियदर्शनी पार्क, नेपीयन्सी रोड
 • विभाग जी-दक्षिण : नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, डॉ. बी. ए. रोड, वरळी
 • विभाग जी-उत्तर : दादर पंपिंग स्टेशन, सेनापती बापट मार्ग
 • विभाग के-पश्चिम : अंधेरी पश्चिम अंबोली व्हिलेज, रहेजा प्लाझा प्लॉट, शाह इंडस्ट्रीयल इस्टेट
 • विभाग एल : चांदिवली फार्म रोड, चांदिवली व्हिलेज
 • विभाग एच-पूर्व : कालिना सांताक्रुझ पूर्व विद्यानगरीजवळ
 • विभाग के-पश्चिम : वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी स्मशानभूमीजवळ अंधेरी पश्चिम
 • विभाग आर-दक्षिण : कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज
 • पी-दक्षिण : दादासाहेब फाळके चित्रनगर, गोरेगाव पूर्व
 • विभाग एम-पूर्व : चिता कॅम्प पोलिस स्टेशन समोर, ट्रॉम्बे
 • विभाग एम-पूर्व : बोर्बादेवी चौकाजवळ, एन. जी. आचार्य मार्ग, गोवंडी
 • विभाग एम-पूर्व : माहुल डी. बी. रिअॅल्टी, इमारत क्रमांक ७२
 • विभाग एन : घाटकोपर पश्चिम बर्वेनगर स्मशानभूमीजवळ
 • विभाग एस : कांजूर पश्चिम कांजूर मार्ग व्हिलेज
 • विभाग एस : भांडुप व्हिलेज, सिएट टायर कंपनीसमोर, नाहुल व्हिलेज रोड
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा