Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

महापालिका पावणेपाच कोटी रुपयांच्या यांत्रिकी झाडू खरेदी करणार

मुंबई महापालिका यांत्रिकी झाडू खरेदी करणार आहे. यांत्रिकी झाडूची खरेदी व देखभालीपोटी तब्बल पावणेपाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेनं केली आहे.

महापालिका पावणेपाच कोटी रुपयांच्या यांत्रिकी झाडू खरेदी करणार
SHARES

मुंबई महापालिका यांत्रिकी झाडू खरेदी करणार आहे. यांत्रिकी झाडूची खरेदी व देखभालीपोटी तब्बल पावणेपाच कोटी रुपये खर्च करण्याची तयारी पालिकेनं केली आहे. एका झाडूनं दर दिवशी सुमारे २८ कि.मी. लांबीच्या रस्त्याची सफाई करण्याचा मानस आहे. पूर्वी खरेदी केलेल्या यांत्रिकी झाडूचा पुरेसा वापर होत नाही. तसंच, यांत्रिकी झाडूंना सफाई कामगारांकडून कडाडून विरोध होत आहे. तरीही त्यांची खरेदी करण्यात येत असल्यानं वाद उद्भवण्याची चिन्हं आहेत.

दिवसेंदिवस महानगरातील हवेची गुणवत्ता ढासळत असून, त्याची दखल 'राष्ट्रीय हरित प्राधिकरणा'नं घेतली आहे. प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यानुसार, 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम' नावाची पंचवार्षिक योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट्य ठेवण्यात आलं आहे.

या उपक्रमाअंतर्गत राज्य सरकारच्या ‘प्रदूषण नियंत्रण महामंडळाने’ मुंबई महानगरपालिकेला १० कोटी रुपये निधी दिला आहे. या निधीतून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय महापालिकेकडून केले जात आहेत. त्यातूनच यांत्रिक झाडू विकत घेण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. प्रत्येक यांत्रिक झाडूनं दिवसाला किमान २८ कि.मी. लांबीचे रस्ते स्वच्छ केले जातील. तसंच, २ पाळ्यांमध्ये ८ तास काम करण्यात येणार आहे.

या यांत्रिक झाडू खरेदीबरोबरच वर्षभराचे प्रचलन आणि देखभालीसाठीही निविदा मागवण्यात आल्या होत्या. हे प्रत्येक वाहन खरेदी करण्यासाठी पालिका ४५ लाख असे २ कोटी २५ लाख रुपये खर्च करणार आहे. तर वर्षभराच्या देखभालीसह प्रचलनासाठी प्रत्येक वाहनाचा खर्च मिळून प्रत्येक महिन्याला २ लाख ४३ हजार असे वर्षांला १ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये खर्च येणार आहे. सर्व करांसह हा खर्च ४ कोटी ८५ लाख ६३ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

ही यांत्रिकी झाडू वाहने विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत. या वाहनांनी एकत्र केलेला कचरा, राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून कचराभूमीत नेला जाणार आहे. ही वाहने दोन पाळ्यांत चालणार असून प्रत्येक पाळीत चार तास काम होणार आहे. ही वाहने ताशी ६ कि.मी. या गतीने प्रतिदिन २८ कि.मी. तसेच महिना ८४० कि.मी. लांबीच्या रस्त्याची साफसफाई करणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा