Advertisement

मालमत्तेची कुंडली आता एका क्लिकवर

मालमत्तेची नोंदणी तसंच मुद्रांक शुल्क वसुलीसह मालमत्तेच्या सर्व प्रक्रिया २००२ मध्ये आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. आय-सरिता या संगणकीय प्रणालीअंतर्गत मालमत्तेची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क वसुली केली जाते. त्यापुढं जात नोंदणी व मुद्रांक शुल्क ग्राहकांसाठी प्रत्येक मालमत्तेची इत्यंभूत माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे.

मालमत्तेची कुंडली आता एका क्लिकवर
SHARES

गृहखरेदी वा कुठल्याही प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करायची म्हणजे खूपच काळजी घ्यावी लागते. संबंधित मालमत्ता अधिकृत आहे का? इथंपासून ते त्या मालमत्तेविरोधात कुठला वाद तर न्यायालयात नाही ना? इथंपर्यंत सर्व काही तपासावं लागतं. पण प्रत्येकवेळी, प्रत्येकाला मालमत्तेची माहिती मिळेतच असं नाही. तर मिळाली तर ती १०० टक्के खरी असतेच असंही नाही. त्यामुळं अनेक ग्राहकांची फसवणूक होते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील प्रत्येक जुन्या-नव्या मालमत्तेची कुंडली एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे.


कुठं मिळणार माहिती?

मालमत्तेची नोंदणी तसंच मुद्रांक शुल्क वसुलीसह मालमत्तेच्या सर्व प्रक्रिया २००२ मध्ये आॅनलाइन करण्यात आल्या आहेत. आय-सरिता या संगणकीय प्रणालीअंतर्गत मालमत्तेची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क वसुली केली जाते. त्यापुढं जात नोंदणी व मुद्रांक शुल्क ग्राहकांसाठी प्रत्येक मालमत्तेची इत्यंभूत माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे.


फायदा काय होणार?

एखादी मालमत्ता कुठं आहे, त्याचं क्षेत्रफळ काय, ज्या जागेवर मालमत्ता आहे त्या जागेचा इतिहास, ती मालमत्ता याआधी किती जणांनी खरेदी केली आहे, मालमत्तेवर काही थकबाकी आहे का, कर्ज आहे का, मालमत्तेबाबत काही वाद आहेत का, न्यायालयात खटला दाखल आहे का? या आणि अशा कित्येक प्रश्नांची योग्य उत्तर एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दिली आहे.


महिन्याभरात सेवा सुरू

ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठीची प्रक्रिया वेगात सुरू असून महिन्याभरात ही सेवा कार्यन्वित करण्यात येणार आहे. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील मालमत्तांची अचूक-योग्य माहिती मिळावी यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं राज्य सरकारच्या इ-डिस्ट्रिक्ट इन्फाॅर्मेशन सिस्टिम आॅफ एनआयसी अर्थात 'डिसनिक' या संगणकीय प्रणालीची मदत घेणार आहे.


अपिलांचीही माहिती

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे दाखल असलेल्या अपिलांसह इतर सर्व माहिती डिसनिकवर घरबसल्या उपलब्ध होते. त्यामुळं आय-सरिता आणि डिसनिक या दोन संगणक प्रणालींना एकमेकांशी जोडत मालमत्तांची सर्व कुंडली ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महिन्याभरात ही सेवा कार्यान्वित झाल्यास याचा फायदा मुंबईकरांनाही होणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेशात गृहखरेदी वा मालमत्ता खरेदी ही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळं मोठ्या संख्येनं ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

व्यवसाय कर वसूली आणि मुद्रांक शुल्क अधिभाराचं भिजत घोंगडं!

पहिलं घर घ्या, मुद्रांक शुल्कात 'अशी' सवलत मिळवा!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा