सलमान मुंबईकरांना देणार स्वच्छतेचे धडे

 Pali Hill
सलमान मुंबईकरांना देणार स्वच्छतेचे धडे

मुंबई - स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेनं 15 डिसेंबरपर्यंत मुंबईला हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेता सलमान खान मुंबईच्या अभियानाचा ब्रँड अँम्बेसेडर असणार आहे. सलमान खानने मोफत 6 मोबाइल टॉयलेट देण्याची तयारी दर्शवलीय. तर बिईंग ह्युमन ही सलमानची संस्था या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबई लाईव्हला दिली आहे. त्यामुळे यापुढे शौचालयाच्या भिंतीवर, बॅनर येथे शौच करू नका असा संदेश देताना सलमान खान दिसणार आहे. तर सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही सलमान मुंबईकरांना स्वच्छतेचे धडे देणार असल्याचेही दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

अभियान हाती घेत सलमान खानला ब्रँड अँम्बेसेडर केले आहे. या अभियानांतर्गत महिलांसाठी एक आणि पुरूषांसाठी एक अशी दोन मोबाईल टॉयलेट ठिकठिकाणी बसवण्यात येणार आहेत. तर क्लिनअप मार्शल सक्रीय होणार असून 15 डिसेंबरनंतर उघड्यावर शौच करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Loading Comments